News Update
Home > Politics > नरहरी झिरवळ यांच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांची सरकारवर टीका

नरहरी झिरवळ यांच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांची सरकारवर टीका

नरहरी झिरवळ यांच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांची सरकारवर टीका
X

ठाकरे सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दुपारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. तसेच विधानभवनाचे सचिव राजेंद्र भागवत यांचीही भेट घेतली. उद्याच्या आसन व्यवस्थे संदर्भात, सुरक्षे संदर्भात आणि आजारी आमदारांच्या व्यवस्थे संदर्भात चर्चा करण्यात आली, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. एका माणसाने मुख्यमंत्री व्हावे आणि बारा कोटी जनतेने दुःख सहन करावं यासाठी लोकशाही आहे का? खुर्ची तुटेपर्यंत खुर्ची सोडू नये यासाठी लोकशाही आहे ? अशी जोरदार टीका मुनगंटीवार यांनी केली. जशी प्रश्नपत्रिका असेल तसे प्रश्न सोडवू आमची आजूनही वेट अँड वॉचची भूमिका आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Updated : 29 Jun 2022 10:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top