News Update
Home > Politics > उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला, अनेक स्तरातून कौतुकाचा वर्षाव

उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला, अनेक स्तरातून कौतुकाचा वर्षाव

उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला, अनेक स्तरातून कौतुकाचा वर्षाव
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे या मागणीसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३५च्यावर आमदारांनी बंड केले आहे. यानंतर व्यथित झालेल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे या आमदारांना आवाहन करत आपण राजीनामा द्यायला तयार आहोत, पण शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. तसेच आपल्याला मुख्यमंत्री पदाचा लोभ नाही, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा सोडून मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या या निर्णयानंतर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात भावनिक होऊन वर्षावर दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांचा ताफा मातोश्रीवर निघाला तेव्हा रस्त्याच्य् दोन्ही बाजूला शिवसैनिकांनी जयजयकाराच्या घोषणा दिल्या. मातोश्रीबाहेरही हजारो शिवसैनिक आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा घोषणा देत होते.

अभिनेत्री सीमी गरेवाल यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना सत्तेचा लोभ नाहीये, त्यांना कपटी राजकारण करता येत नाही. असा उत्तुंग आणि एकनिष्ठ नेता दुर्मिळ असतो, असे म्हटले आहे.

तर प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजा आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले, पण राज्यातील जनतेकडे लक्ष देण्याचाही टोला लगावला आहे. मा. उद्धव ठाकरे साहेब आपण लाईव्ह येऊन "शिवसैनिकांना" दिलासा दिलात उत्तमच..! आता एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेत येऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेला दिलास द्या ना..?

मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केले आहे. "@CMOMaharashtra च्या सत्यतेचे कौतुक करा. @ShivSena सोबत आमचे राजकीय मतभेद असू शकतात पण आज उद्धव ठाकरे हे ऐकल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला आहे. तुमच्या नम्रतेने सर्व विरोधकांना जोरदार चपराक दिली. @AUThackerayया शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. राज्यसभा निवडणुकीतही एमआयएमने भाजपविरोधात महाविकास आघाडीला मतदान केले होते."

सोशल मीडियावर देखील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे कौतुक करत, त्यांना समर्थन दिले आहे.

Updated : 23 Jun 2022 2:37 AM GMT
Next Story
Share it
Top