News Update
Home > Politics > आदित्य ठाकरे यांचा बंडखोर आमदाराशी पहिला संवाद

आदित्य ठाकरे यांचा बंडखोर आमदाराशी पहिला संवाद

आदित्य ठाकरे यांचा बंडखोर आमदाराशी पहिला संवाद
X

शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना तिखट शब्दात टीका केली, तरी त्यांना मुंबईत पाय ठेवून दाखवा अशी धमकीही दिली. पण आता एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे आणि बंडखोर आमदार यांच्यात पहिल्यांदाच संवाद झाला.

आमदार प्रकाश सुर्वे यांनी विधिमंडळ आवारात आदित्य ठाकरे यांना हस्तांदोलन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी प्रकाश सुर्वे यांना सुनावले. "मी तुमच्याकडे येत होतो, असं खरंच अपेक्षित नव्हतं. माझं तुमच्यावर खरोखर प्रेम होतं हे तुम्हाला पण माहिती आहे. ठीक आहे बघा आता विचार करा, पण मला स्वत:ला दु:ख झाले हे तुम्हाला पण माहिती आहे" या शब्दात आदित्य ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.


Maharashtra floor test Aditya Thackeray shivsena rebel mla

Updated : 4 July 2022 8:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top