Home > Politics > विधानसभा अध्यक्ष निवडणुकीआधीच उपाध्यक्षांचा गेम?

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीआधीच उपाध्यक्षांचा गेम?

एकनाथ शिंदे आणि भाजपला विधिमंडळाच्या पटलावर मात देता येऊ शकते, असा राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रसेचा अंदाज आहे. पण ती वेळच येऊ नये यासाठी विरोधी गटाने मोठी चाल खेळून सत्ताधाऱ्यांचा मोठा मोहरा पाडण्य़ाची तयारी केल्याची चर्चा आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीआधीच उपाध्यक्षांचा गेम?
X

महाविकास आघाडी सरकारच्या संकटात आता आणखी वाढ होणार आहे. या सरकारचा विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रीयेच्या वेळी पराभव करण्याच्या रणनितीमध्ये एकनाथ शिंदे गट आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपने बदल केल्याचं सांगण्यात येत आहे.

विधानसभा सभागृहात डावपेचांच्या आधारे सरकार पाडणं किंवा वाचवण्याची तयारी आता दोन्ही बाजूने सुरू आहे. शहाला काटशह देण्यासाठी डावपेच आखण्यात येत आहेत. सध्या विधानसभा उपाध्यक्षांच्या माध्यमातून सरकार वाचवण्याचे होत असलेले प्रयत्न लक्षात घेता अध्यक्षाच्या निवडणुकीच्या आधीच विधानसभा उपाध्यक्षांवरच अविश्वास ठराव आणण्यासाठी विरोधी पक्षांनी आता तयारी सुरू केली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झाली तर सरकारकडील संख्याबळ किती आहे, हे लगेच उघड होईल आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत येईल. त्यामुळे १२ सदस्यांचं सदस्यत्व अपात्र ठरवण्याबरोबरच विरोधी पक्षातील काही आमदारांचं सदनात निलंबन घडवून आणलं तर सरकारवरचा धोका टळू शकतो. अशावेळी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीआधीच विधानसभा उपाध्यक्षांचांच गेम करण्याची रणनिती आखण्यात येत आहे.

शिवसेनेने गटनेता म्हणून अजय चौधऱी यांची निवड केल्याचे पत्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले होते. शिवसेनेची ही विनंती झिरवळ यांनी मान्य केली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी गटातर्फे शह देण्याची रणनीती आखली जात आहे.

यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी अधिवेशन सुरू असावे लागते. तसंच विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी सबळ कारण द्यावे लागते. त्याधी सभागृहात संख्याबळ सिध्द करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या पक्षांमध्ये विधिमंडळातील नियमांचे तज्ज्ञ बसले आहेत. त्यांनी रणनीती तयार केली असेल, असेही मत केसरी यांनी व्यक्त केले.

Updated : 24 Jun 2022 8:45 AM GMT
Next Story
Share it
Top