Home > Politics > शिंदे गटाच्या आमदारांवर निधी वाटपात अन्याय झाल्याच्या आरोपाला अजित पवार यांचे उत्तर

शिंदे गटाच्या आमदारांवर निधी वाटपात अन्याय झाल्याच्या आरोपाला अजित पवार यांचे उत्तर

शिंदे गटाच्या आमदारांवर निधी वाटपात अन्याय झाल्याच्या आरोपाला अजित पवार यांचे उत्तर
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्र्याचे अभिनंदन करताना अजित पवार यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमताचा ठराव जिंकला. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलत होते. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी निधी वाटपात अन्याय झाल्याचा आरोप केला होता. त्या आरोपांना प्रत्युत्तर देत अजित पवार यांनी यादीच वाचून दाखवली.

अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या खात्याला 12 हजार कोटींचा निधी दिला. एवढंच नाही तर आणखी 1 हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या खात्याला पहिल्या वर्षी 3061 कोटी रुपये, 2 हजार 177 कोटी आणि 2021-22 ला 4 हजार 52 कोटी रुपये दिले आणि आत्ता 2 हजार 645 कोटी रुपये असं मिळून 12 हजार कोटी रुपये दिले. त्यानंतर या अधिवेशनात 1 हजार कोटी रुपये देणार असल्याची चर्चा झाली होती, असंही अजित पवार म्हणाले.

शिवभोजन केंद्राच्या वाटपात संजय राठोड यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी जी शिफारस केली. त्यात 1 हजार 200 शिवभोजन केंद्र मंजूर करण्यात आले. त्यापैकी 401 शिवभोजन केंद्र शिवसेना पक्षाच्या आमदार-खासदारांच्या शिफारसीवरून मंजूर करण्यात आले, असंही अजित पवार म्हणाले. त्याबरोबरच दादाजी भुसे यांच्याकडे असलेल्या कृषी खात्याचं साडेसातशे कोटींचं काम पुर्ण केलं, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

शिवसेना आमदारांना देण्यात आलेल्या निधीपैकी एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात 366 कोटी, संदीपान भुमरे यांना 167 कोटी, उदय सामंत यांना 221 कोटी, दादाजी भुसे 306 कोटी, गुलाबराव पाटील 309 कोटी, शंभुराजे देसाई यांना 294 कोटी, अब्दुल सत्तार 206 कोटी, अनिल बाबर 186 कोटी, महेश शिंदे 170 कोटी, शहाजीबापू पाटील 151, महेंद्र थोरवे 154 कोटी रुपये देण्यात आले. तरीही तुम्ही राष्ट्रवादीच्या अर्थ खात्यावर निधीवाटपात अन्याय झाल्याचे सांगत प्रश्न उपस्थित केले.

त्याबरोबरच काँग्रेसचे मातब्बर नेतेही याबाबत आमच्यावर आरोप करत होते. त्यावेळी मी बोललो नाही. कारण आरे ला कारे का करायचं असं म्हणून गप्प बसलो, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांची जोरदार बॅटिंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलतान अजित पवार यांनी कमी शब्दात जास्तीत जास्त बॅटिंग केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर सोमवारी विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बहुमताची चाचणी यशस्वी केली. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारची जोरदार धुलाई केली.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना अडीच वर्षात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद मिळाल्याने 288 आमदारांपैकी फडणवीस हे सर्वात नशिबवान आमदार असल्याचे म्हटले. त्यानंतर अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही खोचक टोला लगावला.

अजित पवार म्हणाले की, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी अध्यक्षांची निवड घेतली नाही. मात्र आता ताबडतोब झाली. त्यामुळे राज्यपाल एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांनी विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या निवडीवर तातडीने निर्णय घ्यायला हवा. एवढंच नाही तर राज्यपाल जे निर्णय घेत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनातही राज्यपालांविषयी शंका निर्माण व्हायला लागल्या आहेत, असंही अजित पवार म्हणाले.

आम्ही अनेकवेळा राज्यपालांना भेटलो. त्यावेळी एकनाथ शिंदे आमच्यासोबत होते. त्यामध्ये विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न होता. त्यासह ओबीसी आरक्षण यासारख्या प्रश्नांवर भेटीसाठी गेलो असताना राज्यपाल मला आणि एकनाथ शिंदे यांना थांबवून बरंच काही सांगायचे, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, शिवसैनिक कधी नेत्यांसोबत जात नाहीत. याचे अनेक उदाहरण आहेत. जसं छगन भुजबळ यांनी अठरा आमदारांना घेऊन शिवसेना सोडली. मात्र छगन भुजबळ वगळता इतर कुणीही परत निवडून आले नाहीत. नारायण राणे यांच्या काळात बंड झालं. त्यांच्यासोबत गेलेले कुणीही परत निवडून आले नाहीत. त्याच कारण शिवसैनिक हे नेत्यासोबत जात नाहीत.

१०६ आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही आणि ४० आमदार असणारा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे यात काहीतरी काळंबेरं आहे, हे लोकांच्या लक्षात येतं, असं मत अजित पवार म्हणाले.

भाजपची स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनेच्या आधारावर त्यांनी आपला पक्ष वाढवत नेला. मी आजपर्यंत मी कधी बोललो नव्हतो. पण आज मला बोलायचंय. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर अन्याय केला असा आरोप केला गेला. मी काम करत असताना कधी भेदभाव करत नाही. आमदारांचा निधी २ कोटी वरून ५ कोटी केला, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे मंत्री असलेल्या नगरविकास खात्याला १२ हजार कोटी निधी दिला गेला. एवढंच नाही तर आणखी १ हजार कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, असंही अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार यांनी शहाजी बापू पाटील यांचाही डोंगर, झाडीवरून समाचार घेतला. त्याचबरोबरच अजित पवार म्हणाले की, आपले विचार वेगवेगळे असू शकतात. आपल्या भूमिका वेगळ्या असू शकतात. मात्र राज्याच्या विकासाच्या आड या भूमिका येणार नाहीत, हा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

Updated : 4 July 2022 9:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top