Home > Politics > महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा, भाजपचही आंदोलन

महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा, भाजपचही आंदोलन

महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा, भाजपचही आंदोलन
X

महापुरुषांबाबत आक्षेपार्य वक्तव्य करणारे राज्यपाल भागशिंग कोशारी, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आणि काँग्रेस सम विचारी पक्षांनी एकत्र येत हल्ला बोल मोर्चा 11 वाजता निघणार आहे. एक लाखांपेक्षा जास्त लोक या मोर्चात सहभागी होतील असा दावा आघाडीच्या नेत्यांनी केलाय.

हा मोर्चाचा मार्ग भायखळा ते सीएसएमटी असा साडेपाच किलोमीटर पर्यंत असणार आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात विविध मुद्यांवर महाविकास आघाडीची एकजुतात तसच शक्तिप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न या मोर्चातून करण्यात येणार आहे.

शरद पवारही सहभागी

महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेही ह्या मोर्चात सहभागी होणार आहेत.अगोदर शरद पवार हे तब्बेतीच्या करणाने ह्या मोर्चात सहभागी होण्यावर शांशकता होती. तसेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अंबादास दानवे ,राष्ट्रवादी कडून अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , नाना पटोले यासह आघाडीचे दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

भाजपचेही आंदोलन

शिवसेना ठाकरे गटाचे सुषमा अंधारे हे सतत हिंदू देव देवतांबाबत आक्षेपार्य वक्तव्य करत असल्याने तसच खासदार संजय राऊत यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म स्थळावरून केलेल्या वक्तव्यावरून भाजनेही आक्रमक भुमीका घेत मुंबईत माफी मांगो आंदोलन होणार आहे.सुषमा अंधारे विरोधात वारकरी संप्रदाय अधिक आक्रमक झाला आहे. भाजपनेही महाविकास आघाडीला प्रत्युत्तर म्हणून माफी मांगो आंदोलन पुकारलं आहे.

Updated : 17 Dec 2022 6:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top