Home > Politics > लोकसभा कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित, कोणी काय म्हटलं?

लोकसभा कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित, कोणी काय म्हटलं?

लोकसभा कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित, कोणी काय म्हटलं?
X

संसदेचं पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार होतं. मात्र, विरोधकांच्या जोरदार गदारोळामुळे लोकसभा कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज या संदर्भात बोलताना माहिती दिली.

17 व्या लोकसभेच्या 6 व्या अधिवेशनाचा आज समारोप झाला. या सत्रात अपेक्षेप्रमाणे सभागृहाचे कामकाज झाले नाही. याबद्दल मला दु: ख आहे. माझा प्रयत्न असतो की सभागृहात जास्तीत जास्त काम व्हावं, वैधानिक तसेच सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी.

संसदेच्या सर्व सदस्यांकडून ही अपेक्षित आहे की, आपण सभागृहामध्ये काही मर्यादा राखल्या पाहिजेत. आपल्या संसदीय मर्यादा अत्यंत उच्च दर्जाच्या आहेत. मी सर्व खासदारांना विनंती करतो की, संसदीय अधिवेशनांनुसार सभागृह चालू द्यावे. फलक आणि घोषणा आमच्या संसदीय परंपरेला अनुरूप नाहीत. यावेळी सतत डेडलॉक (गतिरोध) होता, हा डेडलॉक संपू शकला नाही. संसदेच्या कामकाजाच्या दृष्टीने गेली दोन वर्षे अधिक फलदायी ठरली आहेत. या अधिवेशनात 20 विधेयक मंजूर झाली.

दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल म्हणाले की, काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. सभागृहात काम होऊ न देणं, मंत्र्यांच्या हातातून कागद हिसकावून फाडण्यात आले. काल तर वर पुस्तकं फेकण्यात आली.

सोबतच, अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर हल्ला करत ज्या पक्षाला 2 वर्षे आपला अध्यक्ष निवडता आला नाही, ज्या पक्षाचे खासदार त्यांच्याच सरकारची बिले फाडतात, जो पक्ष सभागृह चालवू देत नाही, ज्यांना रस्त्यात काहीही करायला लाज वाटते, तेच सदनामध्ये करतात.

त्याचवेळी, सरकारवर आरोप करताना, अधिर रंजन चौधरी म्हणाले 'वारंवार विनंती करूनही, सरकारने संसदेत पेगाससवर चर्चा करण्याची संधी दिली नाही. शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा झालीच नाही. राज्यसभा आणि लोकसभेत पेगाससवर सरकार वेगवेगळी विधानं देत आहे. तर, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय वेगवेगळी विधानं देत आहे.

मात्र, लोकसभेमध्ये पेगासस, शेतकरी कायदे आणि महागाईवर सतत गदारोळ होत राहिला. विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दररोज स्थगित करावे लागले.

Updated : 11 Aug 2021 12:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top