Home > Politics > कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का

कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का

कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का
X

राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये कोकण शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये महाविकास आघाडीला मोठा दणका बसला आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघात (Kokan Teacher Election) शेकापचे बाळाराम पाटील विरुध्द भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar mhatre Vs Balaram Patil) यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये पहिल्याच फेरीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला.

पहिल्या फेरीत ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar mhatre Win) यांना 22 हजार तर बाळाराम पाटील (Balaram patil) यांना साडेनऊ हजार मतं मिळाले आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय हा महाविकास आघाडीसाठीचा मोठा धक्का मानला जात आहे.

हा विजय माझा एकट्याचा नसून सर्व शिक्षकांचा आहे. मी गेल्या सहा वर्षात शिक्षकांसाठी केलेल्या कामाची ही पावती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी दाखवलेला विश्वास आज सार्थ ठरला. मला शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न सोडवायचा आहे, असं मत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयानंतर सांगितले.

बाळाराम पाटील (Balaram Patil) यांनी पराभवानंतर बोलताना सांगितले की, मला ज्या मतदारांनी मदत केली. त्या सर्वांचे आभार. हा निकाल माझ्यासाठी अनपेक्षित आहे. मात्र आलेला निकाल खुल्या दिलाने मान्य करून पुढील वाटचाल करणार असल्याचे बाळाराम पाटील म्हणाले.

Updated : 2 Feb 2023 7:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top