Home > Politics > गांजा मारून कोणालाही बोलता येत; किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला

गांजा मारून कोणालाही बोलता येत; किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला

गांजा मारून कोणालाही बोलता येत; किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला
X

मुंबई : शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यापार्श्वभुमीवर आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी बीकेसी कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. तर त्यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असली तर नागरीकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्यावरून टीका केली.

किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील बीकेसी कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या की, घाबरण्यापेक्षा आपण काळजी घेऊया. घाबरणे हे आमच्या रक्तात नाही. त्यामुळे आम्ही घाबरत सुध्दा नाही. खुर्चीत गांजा मारून कोणालाही बोलता येते. पण परिस्थिती तपासून पाहताना आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला धाडस दिले आहे. आम्ही मृत्यूला घाबरत नाही. त्यामुळे तेवढंच धाडस आपणही दाखवावे, असा टोला भाजपा नेते किरीट सोमय्या यांना लगावला.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्यात लॉकडाऊनची चर्चा सुरू आहे. त्यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती नागरीकांना दाखवली जात आहे, असे म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. तर सोमय्या पुढे म्हणाले की, सत्ताधारी नेते स्वतःचं राजकीय वजन वाढवण्यासाठी व आर्थिक कमाई करण्याच्या विचारातून कोरोनाची तिसरी लाट कशी भयानक आहे याची भीती जनतेमध्ये पसरवत आहेत. ते त्यांनी थांबवावे, असे मत व्यक्त केले.

95 टक्के ओमायक्रॉन रुग्णांना वैद्यकीय़ उपचाराची गरज पडत नाही. ते दोन तीन दिवसात बरे होत आहेत. मात्र खूप कमी प्रमाणात असलेले लोक म्हणजे सहव्याधी असलेल्या लोकांनी अधिक काळजी घ्यावी, असं सोमय्या यांनी म्हटले होते. त्यावरून किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांना टोला लगावला.


Updated : 8 Jan 2022 9:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top