Home > Politics > हिंमत असेल तर मला रोखून दाखवा;किरीट सोमय्या यांचे पवार-ठाकरे यांना आव्हान

हिंमत असेल तर मला रोखून दाखवा;किरीट सोमय्या यांचे पवार-ठाकरे यांना आव्हान

हिंमत असेल तर मला रोखून दाखवा;किरीट सोमय्या यांचे पवार-ठाकरे यांना आव्हान
X

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्यावर निघाले आहेत. त्याआधी त्यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेरुनच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतले, त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आव्हान दिलं आहे. आता मी ठाकरे- पवार यांना नोटीस दिली की, हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत सोमय्या यांनी पवार आणि ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

सोबतच त्यांनी म्हटले आहे की, मी कोल्हापुरात अंबाबाईला प्रार्थना करणार की, तू पापाच्या राक्षसाचा वध केला होता. तसाच भ्रष्टाचाररुपी राक्षस जो महाराष्ट्रात फोफावला आहे, त्याचा वध करण्याची शक्ती आम्हाला दे.

दरम्यान तुम्हाला पुन्हा पोलिसांकडून नोटीस देण्यात आली का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सोमय्या म्हणाले की आता मी त्यांना नोटीस दिली आहे. तुमच्यात हिंमत असेल तर मला थांबवून दाखवा. आम्ही जाणार, अंबाबाईचं दर्शन घेणार आणि त्या भ्रष्टाचाररुपी राक्षसाचा वध करणार, असा इशारा सोमय्या यांनी यावेळी दिला.

Updated : 27 Sep 2021 10:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top