Home > Politics > मी एक हातोडा मुख्यमंत्र्यांना देणारः किरिट सोमय्या

मी एक हातोडा मुख्यमंत्र्यांना देणारः किरिट सोमय्या

मी एक हातोडा मुख्यमंत्र्यांना देणारः किरिट सोमय्या
X

आज मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांची दिल्लीच्या ED कार्यालयात चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते माजी खासदार किरिट सोमय्या यांनी दिल्ली येथे माध्यमांशी बातचीत केली. यावेळी माध्यमांशी बोलताना किरिट सोमय्या यांनी…

संजय पांडे असो की संजय राऊत असो किंवा अनिल परब या तिघांचा हिशोब घेतल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही. संजय पांडे यांनी हजारो कोटींचा घोटाळा केला आहे. त्यांनी टेक्नॅालॅाजी मार्फत भ्रष्टाचार केला आहे. असा गंभीर आरोप केला आहे.

यावेळी सोमय्या यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले… आता संजय राऊत कोर्टात जाता घामाघूम होताहेत. संजय राऊतांना हिशोब द्यावा लागणार आहे. असं म्हणत सोमय्या यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.

तसंच सोमय्या यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. अनिल परब यांचे रिसॅार्ट अद्याप पाडले नाही. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी कारवाई केली नाही.ठाकरे पिता पुत्राचा हा दुटप्पीपणा केला आहे. मी एक हातोडा मुख्यमंत्र्यांना देणार आहे. महाराष्ट्र सरकारनं ताबडतोब रिसॅार्ट पाडण्याची सुरूवात करावी. अशी मागणी किरिट सोमय्या यांनी केली आहे. पाहा काय म्हणाले किरिट सोमय्या


Updated : 5 July 2022 2:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top