Home > Politics > सामना : रशिया, चीन, पाकिस्तान या त्रिकुटाच्या हालचालींवर लक्ष ठेवा

सामना : रशिया, चीन, पाकिस्तान या त्रिकुटाच्या हालचालींवर लक्ष ठेवा

रशिया, चीन, पाकिस्तान या त्रिकुटाच्या हालचालींवर लक्ष ठेवा असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला देण्यात आलाय.

सामना : रशिया, चीन, पाकिस्तान या त्रिकुटाच्या हालचालींवर लक्ष ठेवा
X

मुंबई : अफगाणिस्तानात उद्या काय व्हायचे ते होईल, पण त्यावरून कतारच्या राजधानीत होणारी रशिया, चीन, पाकिस्तान या त्रिकुटाची बैठक भविष्यात भारतासाठी धोक्याची घंटा ठरु शकते, त्यामुळे या बैठकीकडे लक्ष ठेवायला हवे असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला देण्यात आला आहे. भारत आणि अमेरिकेची वाढती जवळीक,नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसोबतच्या गळाभेटी या चीन आणि रशियाच्या डोळ्यात खुपणाऱ्या आहेत. म्हणुनच भारताच्या दोन शत्रुराष्ट्रांनासह रशियाने नवी मोट बांधली असल्यानचे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

रशियासारखा चांगला मित्र आपण गमावल्याचं म्हणत याबाबत भारताने चिंतन करायला हवे सोबतच अफगाणिस्तानातील संघर्षाचा फटका भारताला बसू नये यासाठी या नवीन त्रिकुटावर बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान अफगाणिस्तान मधील सरकार आणि तालिबान यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहचला आहे. मात्र, तो केवळ अफगाणिस्तानपुरता मर्यादित नसून त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर दूरगामी परिणाम होणार आहे. विशेषत : हिंदुस्थानला या परिणामांचा फटका बसण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. म्हणून तिथे होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर आपण बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे असं सामनामध्ये म्हटलं आहे.

Updated : 7 Aug 2021 5:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top