Home > Politics > बाभळी बंधाऱ्याच्या प्रश्नावर के.चंद्रशेखर राव यांनी सुचविला उपाय..

बाभळी बंधाऱ्याच्या प्रश्नावर के.चंद्रशेखर राव यांनी सुचविला उपाय..

महाराष्ट्रात बीड, जालना या भागात पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी काय उपाय सुचविला आहे पहा…

बाभळी बंधाऱ्याच्या प्रश्नावर के.चंद्रशेखर राव यांनी सुचविला उपाय..
X

महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळे पक्ष आहेत. त्यातच आता आणखी एक नवा पाहुणा केसीआर यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणात येत आहेत. त्यांनी नांदेड येथे भव्य सभा घेतली. या सभेत बोलताना बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून खेळले गेलेले नाटक असल्याची टीका केसीआर यांनी केली.

यावेळी बोलताना केसीआर म्हणाले, या धरणाची क्षमता किती? जवळपास 8 टीएमसी पाणी या धरणात असेल. पण राजकीय हेवेदाव्यासाठी हे सर्व केले जाते. त्यापेक्षा महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी मिळून एकत्र तोडगा काढून हे पाणी शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना द्यावे, असे मत केसीआर यांनी व्यक्त केले.

कायम दुष्काळी असलेल्या मराठवाड्यातील नांदेडमध्ये केसीआर यांनी पाण्याच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले आहे. त्यातच शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी 2 ते 3 हजार टीएमसी पाणी जे समुद्रात वाहून जात आहे. ते पाणी महाराष्ट्रातील बीड, जालना या गंभीर स्थितीतील जिल्ह्यांना देता येईल. पण त्यासाठी एकत्र बसून तोडगा काढावा लागेल, असा उपाय केसीआर यांनी सूचवला. त्यामुळे दुष्काळी भागात पाण्याचा प्रश्न छेडल्याने केसीआर यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे.

Updated : 6 Feb 2023 6:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top