Home > Politics > करुणा मुंडेंची आता 100 जणांविरोधात तक्रार, गुन्हा दाखल

करुणा मुंडेंची आता 100 जणांविरोधात तक्रार, गुन्हा दाखल

करुणा मुंडेंची आता 100 जणांविरोधात तक्रार, गुन्हा दाखल
X

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करूणा शर्मा यांच्यामध्ये वाद सुरु आहे. याच वादासंदर्भात काही कागदपत्र दाखवण्यासाठी त्या पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे दाखवणार होत्या. मात्र, त्या अगोदरच वैजनाथ मंदिर परिसरात विशाखा घाडगे आणि गुड्डी तांबोळी यांच्याशी करुणा शर्मा यांच्याशी वाद झाला. या वादात

'या महिलांनी आम्ही वेगवेगळ्या जाती-समूहाच्या असून धनंजय मुंडे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर तुम्ही बेछूट आरोप करू नका' असं या महिलांनी म्हणताच करुणा शर्मा यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. या सगळ्या वादात गुड्डी तांबोळी या महिलेने करुणा शर्मा यांनी तिला चाकू मारल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात दाखल केले असता, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या दरम्यान आता करुणा शर्मा यांनी देखील या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. करुणा शर्मा यांच्या तक्रारीवरून 80 ते 100 जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188,143,504, 506 भादवि नुसार कोव्हिड नियमांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली आहे.

धनंजय मुंडे यांनी 12 जानेवारी 2021 ला करुणा शर्मा यांच्यासोबत माझे 2003 पासून परस्पर सहमतीने संबंध आहेत. अशी जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर राज्यात धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांच्या नात्याबाबत माहिती समोर आली होती.

Updated : 7 Sep 2021 9:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top