Home > Politics > Karnataka CM : कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला, काँग्रेस कार्यालयाबाहेर लागले शिवकुमार यांचे बॅनर

Karnataka CM : कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला, काँग्रेस कार्यालयाबाहेर लागले शिवकुमार यांचे बॅनर

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर सगळ्या माध्यमांमध्ये चर्चा सुरु होत्या. मात्र आता या चर्चांवर पडदा पडणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा सुरु असतानाच शिवकुमार यांच्या घराबाहेर बॅनर झळकले आहेत.

Karnataka CM : कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला, काँग्रेस कार्यालयाबाहेर लागले शिवकुमार यांचे बॅनर
X

काँग्रेसने कर्नाटकमध्ये 135 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री कोण? यावरून गेल्या चार दिवसात चर्चांना उधाण आले होते. त्यातच शिवकुमार मुख्यमंत्री पदावर अडून बसल्याचे म्हटले जात होते. मात्र आता अखेर हा तिढा सुटला आहे. तर कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या घराबाहेर शिवकुमार यांचे बॅनर झळकले आहेत.

कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. त्यानंतर गेल्या चार दिवसांमध्ये मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमध्ये खलबतं सुरु होते. त्यातच अखेर सिद्धारमैया यांना मुख्यमंत्री पद तर डी के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. यासंदर्भात डी के शिवकुमार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपण उपमुख्यमंत्री होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बंगळूरमधील डी के शिवकुमार यांच्या निवासस्थानाबाहेर नेक्स्ट डेप्युटी सीएम असे बॅनर लागले आहेत. त्याबरोबरच 20 मे रोजी कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना शपथ दिली जाणार आहे. यासंदर्भात मल्लिकार्जून खर्गे यांनी आपल्या ट्वीटरवर माहिती दिली.

आज दुपारी बंगळूरमध्ये काँग्रेस नेत्यांची नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक होणार आहे. त्यासाठी डी के शिवकुमार, सिध्दारमैया यांच्यासह रणदीप सिंह सुरजेवाला, मल्लिकार्जून खर्गे आणि के सी वेणूगोपाल हे बंगळूरला पोहचणार आहेत.

Updated : 18 May 2023 6:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top