Home > Politics > आव्हाडांसारखे बंटी बबली माझे काहीही बिघडू शकणार नाहीत, मुझफ्फर हुसेनचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

आव्हाडांसारखे बंटी बबली माझे काहीही बिघडू शकणार नाहीत, मुझफ्फर हुसेनचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

आव्हाडांसारखे बंटी बबली माझे काहीही बिघडू शकणार नाहीत, मुझफ्फर हुसेनचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर
X

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि काँग्रेसचे स्थानिक नेते मुझफ्फर हुसेन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आम्हाला एकीकडे नरेंद्र मेहता आणि दुसरीकडे सुलतान ए आजम सुलतान ए नया नगर यांची सल्तनत संपवयाची आहे, असं आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड मिरा-भाईंदरमध्ये अल्पसंख्यांक विभागाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला मुझफ्फर हुसेन यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सोमवारी राष्ट्रवादीची सभा झाली या सभेत मला त्यांनी सुलतान ए आजमची उपाधी दिली. माझी सल्तनत संपवण्याची भाषा केली , मी आव्हाड यांना सांगू इच्छितो की या देशात नाही तर जगात एकच सुलताने हिंद आहेत, ते म्हणजे हजरत ख्वाजा गरीब नवाज रहमुदुल्ला आले. त्यांचा आर्शीवाद माझ्यावर आहे. आव्हाडांसारखे बंटी बबली माझे काहीही बिघडू शकणार नाहीत असं प्रत्युत्तर मुझफ्फर हुसेन यांनी दिलं आहे.

मिरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चौफेर टीका केली. मात्र मुझफ्फर हुसेन यांच्यावर केलेली टीका आणि हुसेन यांनी आव्हाडांना दिलेले प्रत्युत्तर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Updated : 2021-11-23T11:30:15+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top