Home > Politics > जांबोरी मैदान रडतंय; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

जांबोरी मैदान रडतंय; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

जांबोरी मैदान रडतंय; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
X

मुंबईत राजकीय पक्षांकडून दिवाळी पहाट कार्यक्रम साजरे केले जात आहेत. त्यातच भाजपने आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील जांबोरी मैदानावर दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावरून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

भाजपने आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानावर दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावरून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सडकून टीका केली .

यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. लोकांमध्ये राहणे, वरळी मतदार संघात नेहमीच शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवाळी पहाट निमित्त कार्यक्रम होत असतात. परंतू महानगरपालिकेच्या निवडणूकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाला शह देण्यासाठी भाजपने पहिल्यांदाच वरळीतील जांबोरी मैदानात दिवाळी पहाट साजरी केली. जांबोरी मैदान रडतंय, लोकही वैतागले आहेत. पैशांचा पाऊस पडतोय. त्यामुळे विचार, संस्कार, आणि प्रत्येकाच्या विचाराला कलाटणी देणारी पहाट आहे", अशी खोचक टीका किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर केली.

जांबोरी मैदानचं का?

मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भाजपाचा हा पहिल्यांदा कार्यक्रम साजरा होत नाही. यापूर्वी देखील दहिहंडी उत्सव भाजपने जांबोरी मैदानावरच कार्यक्रम साजरा केला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलं जातय, असं ही वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केले आहे.

Updated : 24 Oct 2022 9:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top