Home > Politics > Rajyasabha Election : संभाजीराजे निवडून येणार का?

Rajyasabha Election : संभाजीराजे निवडून येणार का?

Rajyasabha Election : संभाजीराजे निवडून येणार का?
X

छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी निवडणूकीच्या रिंगणात अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावेळी भाजपतर्फे राज्यसभेवर गेलेल्या संभाजीराजे यांना यंदा मात्र अपक्ष लढण्याची वेळ का आली असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे. एकीकडे संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपली उमेदवारी जाहीर केली असताना शिवसेनेनंही आणखी एक उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित आहे. त्यातच आता भाजपनेही तिसरा उमेदवार निवडणुक रिंगणात उतरवण्याची घोषणा केल्याने संभाजीराजे यांच्याशी पडद्यामागे काही चर्चा सुरू आहे का अशी शक्यताही व्यक्त केली जाते आहे.

Updated : 19 May 2022 1:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top