Home > Politics > "उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यामुळेच विदर्भावर अन्यायाची मालिका;" देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले

"उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यामुळेच विदर्भावर अन्यायाची मालिका;" देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यामुळेच विदर्भावर अन्यायाची मालिका;  देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले
X

विधीमंडळाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषेद घेतली ह्या पत्रकार परिषेदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून विदर्भावर अन्यायाची मालिका उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यामुळेच सुरु झाली. असे आरोप केले आहेत.

तसेच अण्णा हजारे यांच्या लोकपाल बीलाबाबत देखील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेणातील पुढील प्रमाणे मुद्दे

महाराष्ट्राचा लोकायुक्त कायदा झाला पाहिजे असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सांगत होते. नवीन सरकार आल्याबरोबर अण्णा हजारे समितीने दिलेला रिपोर्ट शासनाने स्वीकारला असून नवीन लोकायुक्त कायदा तयार करण्यास मुख्यमंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांना आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला देखील लोकायुक्तच्या कक्षेत आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे.

वारकरी संप्रदायाचा अवमान करणारे, महापुरुषांचा अवमान करणारे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला याबाबत माहिती नसणारे आमच्यावर टीका करत आहेत.

सीमावाद जणू काही आताच सुरू झालाय असं चित्र तयार केलं जातं आहे.

सीमा वादाला खतपाणी देणारे विरोधी पक्षात: गुप्तहेर खात्याचा अहवाल सरकारकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

गुजरात आणि कर्नाटकात जाण्याची मागणी करणारे कोणत्या पक्षाचे आहेत ते सभागृहासमोर मांडू.

राज्यासाठी राज्य सरकारने कर्ज घेतले

MMRDA साठी सरकार कर्ज घेत नाही

चार आठवड्यांच्या अधिवेशनाबाबत फडणवीस यांनी मांडली भूमिका

त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपले मुद्दे मांडून विरोधकांना आपल्या कामाचा आढावा दिला आहे का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे का?

Updated : 18 Dec 2022 9:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top