Home > Politics > किरीट सोमय्यांच्या यादीत आता मराठवाड्यातील मंत्री; औरंगाबाद,जालनासह मराठवाडा टार्गेटवर

किरीट सोमय्यांच्या यादीत आता मराठवाड्यातील मंत्री; औरंगाबाद,जालनासह मराठवाडा टार्गेटवर

किरीट सोमय्यांच्या यादीत आता मराठवाड्यातील मंत्री; औरंगाबाद,जालनासह मराठवाडा टार्गेटवर
X

गेली अनेक दिवस एकामागून एक घोटाळ्याचे आरोप ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यातच आता पुढील यादीत मराठवाड्यातील मंत्र्यांचा नंबर असल्याचा इशारा किरीट सोमय्यांकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यासह औरंगाबाद,जालना येथील मंत्र्यांच्या घोटाळ्याबाबत आपण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत चर्चा केली असल्याची माहिती खुद्द सोमय्या यांनी दिली आहे.

किरीट सोमय्यांनी काही दिवसापूर्वी टि्वट करीत ठाकरे सरकारमधील 11 नेत्यांची यादी जाहीर करत भ्रष्टाचारचे आरोप केले होते. त्यानंतर या यादीत आणखी वाढ होणार असल्याचे संकेत सोमय्यांनी दिले होते. त्यातच त्यांनी आता ठाकरे सरकारमधील 3 मंत्री आणि 3 जावायांचे असे एकूण 6 घोटाळे दिवाळीनंतर समोर आणणार असल्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद,जालना आणि मराठवाड्यातील मंत्र्यांनी घोटाळे केले असल्याचा सुद्धा त्यांनी सुचवले आहे.

मराठवाड्यातील 'ते' मंत्री कोण ?

विशेष म्हणजे आरोप करतांनी सोमय्या यांनी औरंगाबाद आणि जालना असे स्पष्ट उल्लेख सुद्धा केला आहे. ठाकरे सरकारमधील रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे तर दुसरे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दोघेही औरंगाबादचे असून, आरोग्यमंत्री राजेश टोपे जालन्याचे आहेत. सोबतच बीडचे धनंजय मुंडे, नांदेडचे अशोक चव्हाण,लातूरचे अमित देशमुख आणि संजय बनसोडे हे सुद्धा मराठवाड्यातील मंत्री समजले जातात. त्यामुळे यापैकी सोमय्यांचा इशारा कुणाकडे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Updated : 31 Oct 2021 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top