Home > Politics > आपल्याच बंधुच्या पत्नीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं?: नारायण राणे

आपल्याच बंधुच्या पत्नीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं?: नारायण राणे

आपल्याच बंधुच्या पत्नीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं?: नारायण राणे
X

नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेला रत्नागिरी येथून सुरुवात झाली आहे. या यात्रेत अपेक्षेप्रमाणे राणे यांनी शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत.

आपल्याच बंधुच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कोणी सांगितलं? कोणाला सांगितलं? आणि संस्कार. असे संस्कार. आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकण्याचे…

अशा शब्दात राणे यांनी टीका केली आहे. आता या टीकेमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आता जुन्या गोष्टी काढणार आहेत. काढा ना… दोन वर्षे झाली. शोधत आहेत. काढत आहेत. काढाना… आम्हालाही जुन्या गोष्टी माहीत आहे. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे. जया जाधवची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे. माहीत आहे. आपल्याच बंधुच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कोणी सांगितलं? कोणाला सांगितलं? आणि संस्कार. असे संस्कार. आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकण्याचे… मी टप्याटप्याने सर्व काढणार. सुशांतची केस संपली नाहीये. दिशा सालियनचीही संपली नाही. मी केंद्रात मंत्री आहे. जरा आठवण करा. रिस्ट्रिक्शन देऊन काय करणार. अटक? किती दिवस. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे हे लक्षात ठेवा.

अशा शब्दात राणे यांच्यावर टीका केली आहे.

Updated : 2021-08-27T14:36:20+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top