Home > Politics > मी उद्या हायड्रोजन बॉम्ब टाकणार, देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांचा इशारा

मी उद्या हायड्रोजन बॉम्ब टाकणार, देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांचा इशारा

मी उद्या हायड्रोजन बॉम्ब टाकणार, देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांचा इशारा
X

आर्यन खान प्रकरणात दररोज नवनवीन माहिती देत NCB च्या अधिकाऱ्यांसह भाजपवर निशाणा साधणाऱ्या नवाब मलिक यांच्यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यावर आज नवाब मलिक यांनी देंवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं.

नवाब मलिक म्हणाले 62 वर्षाच्या जीवनात लोकप्रतिनिधी झाल्यावर 26 वर्षाच्या कारकिर्दीत असे आरोप झाले नाही. अंडरवर्ल्डचा आरोप तुम्ही केला. देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रात अंडरवर्ल्डशी काय खेळ आहे. हे उद्या 10 वाजता सांगणार आहे. असं म्हणत नवाब मलिक यांनी फडणवीस यांना इशारा दिला आहे.

जी जमीन आम्ही विकत घेतली. त्या जमिनीवर झोपडपट्टी होती, तिथे आमचं गोडाऊन होतं, तिथे आमची चार दुकान होती. 96 ला मी आमदार झालो माझं निवडणूक कार्यालय तेच होतं. आम्ही भाडेकरू होतो. मुनिरा प्लाम्बर होती. तिने मालकी हक्क देण्याची तयारी दाखवली. त्या जागेची भाडेकरू म्हणून सगळी किंमत चुकवली. मालकीण म्हणून तिने सांगितले. व्यवहार तसा केला. फडणवीस यांनी सरदार अली नाव घेतलं. कदाचित फडणवीस यांना नीट माहिती दिली नाही. त्या कंपाउंड मध्ये सरदार अलीचे वडील तिथे वॉचमन म्हणून काम करत होते. त्यांनी 300 मीटरचं जागेवर आपलं नाव चढवलं होतं. जमीन घेताना त्यांना पैसे देऊन मालकी हक्क घेतला.

मी कोणताही अंडरवर्ल्डशी संबंधित माणूसाकडून जमीन घेतली. जागेच्या मालकीण तिने आम्हांला जमीन दिली. त्या जागेवर सरदार ह्याचे नाव होते. त्यांनी जमीन दिली व्यवहार झाला. कोणताही अंडरवर्ल्ड संबंधित माणूसाकडून जमीन घेतली नाही. जागेच्या मालकीण तिने आम्हांला जमीन दिली. त्या जागेवर सरदार ह्याचे नाव त्यांनी जमीन दिली व्यवहार झाला.

असं म्हणत 'तुम्ही अंडरवर्ल्ड खेळ सुरू केला आहे. नवाब मलिक उद्या अंडवर्ल्ड बॉम्ब फोडणार आहे. फडणवीस कसं मुंबईला हॉस्टेज केलं होतं. एक अंडरवर्ल्ड डॉन परदेशात बसून कसा काम करत होता? उद्या बॉम्ब फोडणार असा इशारा फडणवीस यांना दिला आहे.

नवाब मलिक यांची मुलगी फडणवीसांना नोटीस पाठवणार...

माझी प्रतिमा मलिन करण्याचे काम फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांनी सांगितलं माझ्या जावयाच्या घरुन गाजा जप्त केला. माझी मुलगी नोटीस पाठवणार आहे. अशी माहिती मलिक यांनी दिली आहे.

काय म्हटलं होतं फडणवीस यांनी?

राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडीत मुद्दा उपस्थित करणार असल्याचं सांगत फडणवीस यांनी 1993 मुंबई बॉंम्ब ब्लास्ट प्रकरणातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप केला होता. नवाब मलिक यांनी मुंबईच्या हत्यारांकडून जमीन विकत का घेतली? असा सवाल नवाब मलिक यांना केला असून आज त्यांनी या संदर्भात पुरावे सादर केले आहेत. हे पुरावे आपण शरद पवार यांना देणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावर आज मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे.


Updated : 9 Nov 2021 9:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top