Home > Politics > मी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जाणार होतो: नवाब मलिक

मी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जाणार होतो: नवाब मलिक

मी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जाणार होतो: नवाब मलिक
X

"मी समाजवादी पक्षात होतो. वैचारिक संघर्ष झाल्याने मी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जाणार होतो. मंत्रालयातून निघालो, बीकेसीला पोहोचलो होतो. त्यावेळी एक फोन आला 'मी शरद पवार बोलतोय'…माझे हात पाय थंड पडले. शरद पवारांचा फोन का आला? असा विचार करु लागलो. त्यांनी तुम्ही काँग्रेसमध्ये जात आहात का? असं विचारलं. मी हो सांगितल्यावर त्यांनी 'नाही…तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं आहे' असं सागंत दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलायला सांगितलं," अशी आठवण नवाब मलिक यांनी आज शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सांगितली.

शरद पवारजी तुम्ही मला निमंत्रण दिलं आणि पक्षात घेतलं. तुम्ही कार्यकर्त्यांना ओळखणारे नेते आहेत. आज शरद पवारांमुळे नवाब मलिकला महाराष्ट्र, देशात ओळखतात,असं सांगत नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं.

Updated : 12 Dec 2021 10:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top