Home > Politics > मी नाराज आहे असं मला मीडियातूनच समजलं, बाळासाहेब थोरात यांचा खुलासा

मी नाराज आहे असं मला मीडियातूनच समजलं, बाळासाहेब थोरात यांचा खुलासा

मी नाराज आहे असं मला मीडियातूनच समजलं, बाळासाहेब थोरात यांचा खुलासा
X

बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच नाराजीबाबत मोठं वक्तव्य केले आहे. नाशिक पदवीधर निवडणूकीत सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष फॉर्म भरल्याने बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) संशयाच्या फेऱ्यात अडकले होते. त्यातच सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर बाळासाहेब थोरात यांनी माझ्यासोबत झालेलं राजकारण वेदनादायी होतं, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे बाळासाहेब थोरात नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या (Congress) विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती. त्यावेळी एच के पाटील (H K Patil) यांनी महाराष्ट्रात येऊन थोरात यांची समजूत घातली. मात्र यानंतर आता थोरात यांनी नाराजीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, मी नाराज आहे, असं कोण म्हणालं? संघटनात्मक पातळीवर पत्रव्यवहार होत असतात. मी नाराज आहे, असं मला मीडियातूनच समजलं, अशी प्रतिक्रीया बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

Updated : 15 Feb 2023 11:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top