Home > Politics > "मी काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्ष" सोनिया गांधींनी नाराज नेत्यांना सुनावले

"मी काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्ष" सोनिया गांधींनी नाराज नेत्यांना सुनावले

मी काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्ष सोनिया गांधींनी नाराज नेत्यांना सुनावले
X

काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष हवा आणि पक्ष संघटनेत अमुलाग्र बदल करण्याची मागणी पत्राद्वारे करणाऱ्या नेत्यांना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्ट शब्दात सुनावले आहे. काँग्रेसच्या वर्कींग कमिटीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस अध्यक्षपदासह संघटनेच्या निवडणुका, आगामी विधानसभा निवडणुका आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबच पक्षाच्या वर्कींग कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. जी २३ नेत्यांच्या गटाने पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा असे पत्र लिहिले होते. पक्षाचे हित सगळ्यांनाच हवे आहे, पण मी पूर्णवेळ अध्यक्ष आहे, माझ्याशी मीडियाच्या माध्यमातून न बोलता प्रत्यक्ष बोला, असेही त्यांनी सुनावले आहे.

कोरोनाच्या संकटानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीची पहिलीच प्रत्यक्ष बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी, प्रियंका गांधी, अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री चरणसिंह चन्नी, छत्तीसगडचे भूपेश बघेल उपस्थित होते. गुलाम नबी आझाद देखील या बैठकीला उपस्थित होते.



"मी काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्ष आहे. प्रत्येक सदस्याला पक्षाचे पुनरुज्जीवन व्हावे असे वाटते पण त्यासाठी ऐक्य आणि पक्षाचे हित सर्वतोपरी मानले पाहिजे" असे सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितले. गेल्या दोन वर्षात जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेसचे नेते आणि त्यातही विशेषत: तरुण नेते मोठ्या प्रमाणात आंदोलनं करत आहेत आण पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवत आहे, असे सोनिया गांधी यांनी यावेळी म्हटले.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष कामाला लागला आहे. आपल्यापुढे काही आव्हानं आहेत, पण जर प्रत्येकाने एकाप्याने, प्रामाणिकपणे आणि पक्षाचे हित लक्षात घेऊन काम केले तर काहीही कठीण नाही, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

Updated : 16 Oct 2021 8:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top