Home > Politics > एकनाथ खडसे यांना कोण दगा देणार? चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट

एकनाथ खडसे यांना कोण दगा देणार? चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट

एकनाथ खडसे यांना कोण दगा देणार? चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट
X

विधानपरिषद निवडणूकीत मतदान सुरू आहे. तर भाजप आणि महाविकास आघाडीकडून आपापले उमेदवार विजयी होण्याचा दावा केला जात आहे. दरम्यान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा खुलासा केला आहे.

राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची मतं फुटले. त्यामुळे भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत दोन्ही बाजूने सावधगिरीने पावलं टाकले जात आहेत. मात्र भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे सध्या विधानपरिषद निवडणूक लढत आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापार्श्वभुमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे.

विधानपरिषद निवडणूकीत दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये भाजपचे पाच तर महाविकास आघाडीने सहा उमेदवार दिले आहेत. त्यामुळे अकरावी विकेट कुणाची पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील असा दावा केला आहे. तर पाचवी जागा सर्वाधिक मताधिक्याने विजयी होईल, असं मत व्यक्त केले आहे.

पुढे एकनाथ खडसे यांनी भाजपमधील माझे समर्थक मला सहाय्य करतील असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना भाजपच्या उमेदवाराला दगाफटका होऊ शकतो का? असा सवाल बावनकुळे यांना विचारला असता बावनकुळे म्हणाले की, एकनाथ खडसे यांना भाजपकडून नाही तर राष्ट्रवादीकडूनच दगाफटका होईल.

Updated : 20 Jun 2022 7:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top