Home > Politics > त्या आमदारांना सुरतमध्ये कोण घेऊन गेलं, राष्ट्रवादी उत्तर देणार का?

त्या आमदारांना सुरतमध्ये कोण घेऊन गेलं, राष्ट्रवादी उत्तर देणार का?

त्या आमदारांना सुरतमध्ये कोण घेऊन गेलं, राष्ट्रवादी उत्तर देणार का?
X

महाविकास आघाडीतील (MahaVikasAghadi) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे २२ आमदारांसह नॉट रिचेबल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह हे २२ आमदार सुरतमधील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. एकनाथ शिंदे हे भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सर्व आमदार पोलीस सुरक्षेत आणि कडक बंदोबस्तामध्ये होते. तरी एवढ्या मोठ्या संख्येने सत्ताधारी पक्षाचे आमदार मुंबईतून राज्याबाहेर गेल्याचे कसे कळले नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (UddhavThackeray) यांना या नाराजीची अजिबात कल्पना नव्हती का, अशीही चर्चा सुरू आहे.

प्रत्येक आमदाराला पोलीस संरक्षण आहे, मंत्र्यांना जास्त संरक्षण असतं. शहर किंवा राज्य सोडायचं असेल तर हे पोलीस आपल्या वरिष्ठांना कळवतात. जर पोलीस संरक्षणाशिवाय काही VIP मुव्हमेंट असेल तर पोलीसांना त्याची माहिती असते. इतके आमदार जर राज्याबाहेर गेले असतील तर गृहखात्याला याबाबत माहिती नसेल असं मानता येणार नाही. ते स्वतःहून गेले की त्यांना नेण्यात आलं? रात्री नेमकं काय झालं याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने माहिती दिली पाहिजे, असे मत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केले आहे.

Updated : 21 Jun 2022 8:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top