Home > Politics > फुकट बिर्यानीचा वाद, पुणे पोलिसांमधील अंतर्गत राजकारणाचा परिणाम?

फुकट बिर्यानीचा वाद, पुणे पोलिसांमधील अंतर्गत राजकारणाचा परिणाम?

फुकट बिर्यानीचा वाद, पुणे पोलिसांमधील अंतर्गत राजकारणाचा परिणाम?
X

सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेल्याची चर्चा ताजी असतानाच आता पुणे पोलिसांच्या प्रतिमेला तडा जाणारे मोठे प्रकरण सध्या राज्यात गाजते आहे. गुरूवारपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लीपची चर्चा आहे. यामध्ये पुण्यातील एक महिला डीसीपी प्रियंका नारनवरे ह्या आपल्या कर्मचाऱ्याला बिर्यानीची ऑर्डर देत आहेत.

तसेच पुण्यातील एसपी बिर्यानीच मधून ही बिर्यानी फुकट आणण्याची ऑर्डर देत असल्याचे या व्हारयल मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे. ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही या प्रकरणाची दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पण या क्लीपमागे आपल्याला गोवण्याचा इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा कट असल्याचा आरोप पुण्याच्या डीसीपी प्रियंका नारनवरे यांनी केला आहे.

सध्या व्हायरल होत असलेली क्लीप ही एडिट केली असून यामध्ये संबंधित पोलीस हवालदाराने आपले जुने रेकॉर्डिंग त्याच्या सोयीने एडिट करुन व्हायरल केल्याचा आरोप डीसीपी प्रियंका नारनवरे यांनी केला आहे. प्रियंका नारनवरे यांनी साम टीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आपली बाजू मांडली आहे. "पुणे पोलीस मुख्यालयाच्या विद्यमान महिला उपायुक्त स्वप्ना गोरे या पूर्वी पुणे शहर दलात परीमंडळ 1 च्या DCP होत्या.

तेव्हा त्यांचे ऑफिस स्टाफमधील पोलीस नाईक पालवे व सांळुखे हे त्यांच्या पैशाची वसुली करायचे, हप्ते गोळा करायचे...पण आपण डीसीपी म्हणून आल्यानंतर पालवे व सांळुखे यांची बदली झाली. तसेच या पोलिसांची हप्तेगिरी बंद केली. याचाच राग मनात धरुन या सगळ्यांनी संगनमत करुन ही ऑडिओ क्लीप ध्वनी क्लिप व्हायरल करुन बदनामी करण्याचे षडयंत्र केले असा प्रियंका नारनवरे यांनी केला आहे. तसेच स्वप्ना गोरे व त्यांच्या टीम विरुध्द सायबर गुन्हा नोंद करणार आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Updated : 30 July 2021 2:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top