Home > Politics > त्याला डिपॉझिट जप्त करून परत पाठवलाय: अजित पवार

त्याला डिपॉझिट जप्त करून परत पाठवलाय: अजित पवार

त्याला डिपॉझिट जप्त करून परत पाठवलाय: अजित पवार
X

भाजपचे विधानपरीषदेचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand padkar) नेहमी कोणत्या ना कोणता वाद ओढावुन घेत असतात. राज्यात गेल्या दोन दिवसापासुन विरोधीपक्ष नेते अजित पवार ( Ajit pawar) आणि गोपीचंद पडळकर वाक्ययुध्द सुरु आहे . नाशिकमध्ये एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी पवार कुंटुबीयावर टिका केली . टिका करताना पडळकर म्हणा्ले की , बारामतीचे चुलते आणि पुतणे दिवसा दरोडे टाकतात. महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांचा निधी यांनी पळवला आहे. बारामतीला एकही बिबट्या नाही ,तरीही शिरुर तालुक्याचा बिबट्यासंदर्भातील १००० कोटी बारामतीला घेऊन गेले .पवार कुंटुबीयानी राज्यातील अनेक भागाचे नुकसान केले आहे .कृषी प्रदर्शनात पवारानी शेतकऱ्याकडुन पैसे घेतले . तसेच राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे चोर पवार आहेत .अशी बोचरी टिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली .

नेमक काय म्हणाले अजित पवार

या टिकवर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला आहे .मुंबईत प्रसारमाध्यमाशी बोलताना अजित पवार म्हणाले की , "प्रत्येकाला उत्तर देण्यास मी बांधील नाही. कोण कुठला उपटसुंभ, त्याचं डिपॉझिट जप्त करुन मी त्याला पाठवलंय..तुम्ही ज्या माणसाबद्दल मला विचारत आहात , तो काय एवढा मोठा नाहीये , त्यांनी प्रश्न विचारावे आणि मी उत्तरे द्यावी अस होणार नाही.

Updated : 10 Jan 2023 3:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top