Home > Politics > पहिलं बेईमान कोण हे अगोदर भाजपने तपासावे - गुलाबराव पाटील

पहिलं बेईमान कोण हे अगोदर भाजपने तपासावे - गुलाबराव पाटील

पहिलं बेईमान कोण हे अगोदर भाजपने तपासावे - गुलाबराव पाटील
X

मुंबई : भाजपने लोकसभा निवडणुकीत जळगावात चार बंडखोर उमेदवार रिंगणात उतरवले होते, त्यावेळी मी स्वतः भाजपकडे तक्रार केली होती, शिवसेनेविरुद्ध बंडखोर उमेदवार देऊन पहिली बेईमानी भाजपने केली , त्यावेळेस भाजपने बेईमानी केली नसती तर ही वेळ आली नसती.पहिलं बेईमान कोण हे अगोदर भाजपने तपासावे मग बोलावे. पहिले ते बेईमान झाले नसते तर, आज ते जसे म्हणतायेत तसे उद्धव साहेब बेईमान झाले नसते असं वक्तव्य पाणी पुरवठा गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जुना मित्र भाजपलाच टार्गेट करत सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही पलटवार करत शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरे यांचा खरा मुखवटा समोर आला बेईमानीने मुख्यमंत्री पद मिळवलं असा आरोप फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा होती, आणि राजकारणात महत्वकांक्षा असणं चुकीचे नाही मात्र, त्यासाठी मुखवटा परिधान करणं चुकीचं आहे, उद्धव ठाकरे यांनी आता मुखवटा उतरावा आणि मान्य करावं त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याला गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी , शिवसेनेकडे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांना मुख्यमंत्री का केले नाही? असा सवाल उपस्थित केला, त्यावर उत्तर देतांना गुलाबराव पाटील म्हणाले की, हा जर एकट्या शिवसेनेचा प्रश्न असता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते पण हा एकट्या शिवसेनेचा प्रश्न नव्हता सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली म्हणून ते मुख्यमंत्री झाले असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.

Updated : 17 Oct 2021 4:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top