Home > Politics > प्यार का वादा फिफ्टी-फिफ्टी, गुलाबराव पाटील यांचा उध्दव ठाकरे यांना खोचक टोला

प्यार का वादा फिफ्टी-फिफ्टी, गुलाबराव पाटील यांचा उध्दव ठाकरे यांना खोचक टोला

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आदित्य ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटातील आमदारांवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी थेट उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्यार का वादा फिफ्टी-फिफ्टी, गुलाबराव पाटील यांचा उध्दव ठाकरे यांना खोचक टोला
X

गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यामध्ये गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडी म्हणजे प्यार का वादा फिफ्टी-फिफ्टी (Fifty-Fifty) असल्याचा खोचक टोला उध्दव ठाकरे यांना लगावला.

पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Jalgaon Visit)जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते जळगाव आणि चोपडा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन होणार आहे. या पुलाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजुरी देण्यात आली होती. आता त्याचं भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. या विषयावरून गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.

हा पूल व्हावा म्हणून आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला. आता त्याला एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला, असं सांगत गुलाबराव पाटील यांनी पुलाच्या कामाचे श्रेय उद्धव ठाकरेंना देण्यास नकार दिला. तर हे सगळ्यांचं श्रेय असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

तसेच कसबा आणि चिंचवड (Kasaba peth And Chinchwad bypoll) विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मनसेने (MNS) भाजपला पाठिंबा दिला. हा मनसेचा दिल से पाठींबा असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

Updated : 16 Feb 2023 5:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top