Home > Politics > Gujrat Election 2022 : क्रिकेटर रवींद्र जडेजा ची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

Gujrat Election 2022 : क्रिकेटर रवींद्र जडेजा ची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

गुजरात निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. त्यातच आप ने मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली होती. त्यापार्श्वभुमीवर भाजपने 160 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Gujrat Election 2022 : क्रिकेटर रवींद्र जडेजा ची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात
X

Gujrat Election 2022 : गुजरात मध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबर तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबर ला मतदान होणार आहे. 8 डिसेंबर ला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 27 वर्षानंतर पहिल्यांदाच भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी ह्यात तिरंगी लढत पण 'काटे की टक्कर' होणार आहे. ( Gujrat Election fight in AAP, BJP And Congress)

काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर (BJP candidate list) केली आहे. त्यानंतर भाजपने आज 160 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात भाजपन पुन्हा धक्कातंत्राचा वापर करत 38 आमदारांचे तिकिट कापलं आहे. मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल (Bhupendra patel) यांना घाटलोढीया (Ghatlodhia) मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी निवडणूक रिंगणात-

भारताचा स्टार क्रिकेटपटू रवींद्र जडेजा (Ravindra jadeja) ची पत्नीने राजकारणात एन्ट्री केली आहे. जडेजाची पत्नी रिवाबा रवींद्रसिंग जडेजा (Rivaba Ravindra Jadeja) ह्या भाजप उमेदवार (BJP candidate) म्हणून जामनगर उत्तर (Jamnagar North) मधून निवडणूक लढवणार आहे. पत्नीला उमेदवारी मिळाल्यानंतर रवींद्र जडेजाने फेसबुक वर पोस्ट करत पत्नीचा फोटो शेअर करून अभिनंदन केले आहे. रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा या दाम्पत्याने नुकतीच पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.
भाजपच्या अनेक नेत्यांची माघार-

भाजपच्या अनेक दिगग्ज नेत्यांनी निवडणूक न लढण्याची घोषणा केली आहे .यात माजी मुख्यमंत्री विजय रूपानी (Former CM Vijay Rupani) , माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल (DCM Nitin Patel) ,महसूलमंत्री व शिक्षणमंत्री भुपेंद्रसिंह चुडासना (Bhupendrasingh Chudasana) ,ऊर्जामंत्री सौरभ पटेल(Saurabh patel), गृह राज्यमंत्री प्रदीप सिंह जडेजा (Pradip singh Jadeja), ह्या दिग्गज नेत्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

27 वर्षानंतर तिरंगी लढत -

27 वर्षानंतर पहिल्यांदाच गुजरात मध्ये तिरंगी लढत होणार आहे. भाजप आणि काँग्रेस ह्या दोन पक्षातच पारंपरिक पणे दुरंगी लढत होत होती.आता आम आदमी पार्टीच्या एन्ट्री मुळे तिरंगी लढत होणार आहे. यामुळे निवडणुकीत चांगलाच रंग भरणार आहे. आप ने भाजप आणि काँग्रेस समोर मोठं आव्हान उभं केलं आहे. गेल्या वर्षभरात स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आप पार्टीने काँग्रेसला धक्का देत विरोधी पक्षाची जागा घेतली आहे.आप पार्टीचा धसका भाजप आणि काँग्रेसनेही घेतला आहे.

Updated : 11 Nov 2022 2:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top