Home > Politics > Gujrat Election 2022 : गुजरात निवडणुकीत काँग्रेसची निम्मे मत घटली, आप ची शून्यावरून 13 टक्क्यांची वाढ

Gujrat Election 2022 : गुजरात निवडणुकीत काँग्रेसची निम्मे मत घटली, आप ची शून्यावरून 13 टक्क्यांची वाढ

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात निवडणुकीत भाजपने 150 पेक्षा जास्त जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तसेच काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. मात्र आम आदमी पक्षाच्या मतांमध्ये शुन्यावरून 13 टक्के इतकी वाढ झाली आहे.

Gujrat Election 2022 : गुजरात निवडणुकीत काँग्रेसची निम्मे मत घटली,  आप ची शून्यावरून 13 टक्क्यांची वाढ
X

Gujrat Election 2022 : 27 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप विरोधात अँटीइंकंबन्सी (Anti incumbency) कुठेच दिसली नाही. याउलट 2017 च्या निवडणुकीपेक्षा 2022 च्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक मानहानीकारक पराभव पत्करावा लागला तर आपने आपला जम बसवला आहे. आपने शुन्य टक्क्यांवरून झेप घेत 13 टक्के मतं मिळवले आहेत.

काँग्रेस (Congress) च्या मतांमध्ये निम्म्याने घट आपची वाढ

2022 ची गुजरात निवडणुकीचे निकाल ऐतिहासिक मानली जात आहे. भाजपला (BJP) पाहिल्यांदाच 150 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. 2017 मध्ये काँग्रेस ला 77 जागांवर विजय मिळाला होता तर भाजपला फक्त 99 जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसने भाजपला चांगलीच टक्कर दिली होती. मतांच्या टक्केवारीत पाहिले तर काँग्रेसला 41 टक्के मत मिळाली होती. 2022 च्या निवडणुकीत मात्र 16 जागाच काँग्रेसला मिळताना दिसत आहे. 61 जागांच नुकसान काँग्रेसला सोसाव लागत आहे. यामुळे गेल्यावेळ पेक्षा यंदा मतांच्या टक्केवारीत निम्म्याने घट होऊन 21 टक्के मत काँग्रेसला मिळाली आहेत. यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

गुजरात मध्ये काँग्रेसच्या वाताहातीची अनेक कारणे आहेत. यात सर्वात महत्वाचे म्हणजे गुजरातचे नेतृत्व करणारा चेहरा नव्हता. काँग्रेसकडे प्रचारासाठी स्टार प्रचारक नव्हते. राहुल गांधी यांच्या दोन तीनच मोजक्याच सभा झाल्या. सोनिया गांधीनी गुजरात निवडणुकीकडे पाठ फिरवली होती. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा प्रभाव पाडता आला नाही. पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) पत्र पाठवत राहुल गांधीं (Rahul Gandhi) बाबत नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये गेला. त्याने गुजरात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवरही आगपाखड केली होती. हार्दिक पटेलने (Hardik patel) भाजप मध्ये प्रवेश केल्याने पाटीदार मत भाजप कडे वळली त्याचा फायदा भाजपला झाला आणि काँग्रेसला त्याचा मोठा फटका बसला आहे.

'आप'ला शून्यावरून 13 टक्क्यांवर मत

गुजरात विधानसभा लढणाऱ्या अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने (AAP Arvind kejariwal) आपला स्पेस वाढवला आहे. काँग्रेसची मत आपल्याकडे खेचण्यात आप ला यश मिळालं आहे. निकाल हाती येई पर्यंत पाच जागांवर आपचे उमेदवार निवडून आले आहेत. मतांचा टक्का पहिला तर आपला 13 टक्क्यांपर्यंत मत मिळाली आहेत. आप पार्टीने गुजरातच्या जनतेला मोफत वीज, पाणी, यासारख्या घोषणा दिल्या होत्या. मात्र मतदारांनी त्या पचनी पडल्या नसल्या तरी आप पार्टीने गुजरातमध्ये चांगलेच पाय पसरले आहेत. त्यामुळे हा काँग्रेस बरोबर भाजपलाही धोक्याचा इशारा आहे. गुजरातच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याने राष्ट्रीय पार्टीचा होण्याचा मार्ग आम आदमी पार्टीचा मोकळा झाला आहे.

49 टक्क्यावरून भाजपला 54 टक्के मत -

गेल्या 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला घाम फोडला होता. त्यावेळी 99 जागाच भाजपला जिंकता आल्या होत्या. 2022 च्या निवडणुकीत भाजपने मागील चूक सुधारत ऐतिहासिक विजय मिळवला. गेल्या वेळी 49 टक्के मत मिळाली होती. यंदा मात्र 5 टक्क्यांनी भाजपन जास्तीचे मत मिळवत 54 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. यामुळं भाजपला 157 जागा मिळाल्या.

गुजरात हातातून गेलं तर केंद्रातील दिल्ली ही जाऊ शकते. तसेच याचा देशभर वेगळा मेसेज जाऊ शकतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं होम ग्राउंड असलेल्या गुजरातमध्ये भाजपने पूर्ण ताकद लावली होती. मोदींचे अनेक रॉड शो झाले. तसेच गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचही होम ग्राउंड असल्याने गुजरात संपूर्ण ताकद गुजरात मध्ये भाजपने लावली होती. तसेच नियोजन बद्ध प्रचार करून गुजरातचा विकास आणि अस्मिता हा मुद्दा मांडल्याने त्याचा फायदा ऐतिहासिक विजयाच्या स्वरूपात भाजपला झाला.

Updated : 8 Dec 2022 12:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top