Home > Politics > गुजरातच्या मुन्नाभाईने लावला राष्ट्रीय सुरक्षेला चूना

गुजरातच्या मुन्नाभाईने लावला राष्ट्रीय सुरक्षेला चूना

गेल्या काही वर्षांपुर्वी मुन्नाभाई चित्रपट आला होता. त्यामध्ये मुन्नाभाई ज्या पध्दतीने अनेकांना वेड्यात काढतो. त्याच पध्दतीने आपण पंतप्रधान कार्यालयातील अप्पर सचिव असल्याचे सांगत जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराकडून VIP ट्रीटमेंट घेत होता. अनेक ठिकाणी सामान्य माणसांना जाणं शक्य नव्हतं अशा ठिकाणी हा व्यक्ती लष्कराच्या संरक्षणात जात होता. हा भामटेपणा करणाऱ्या व्यक्तीचं नाव किरण पटेल आहे. त्याने थेट राष्ट्रीय सुरक्षेलाच चूना लावला आहे.

गुजरातच्या मुन्नाभाईने लावला राष्ट्रीय सुरक्षेला चूना
X

पंतप्रधान कार्यालयातील 'अपर सचिव" असल्याचा दावा करत किरण पटेल (Dr. Kiran Patel) जम्मू काश्मीरमध्ये पोहचला. सरकारने आपल्याला दक्षिण काश्मीरमध्ये सफरचंद बागांसाठी खरेदीदार शोधण्यासाठी पाठवले आहे, असं म्हणून किरण पटेल (Kiran Patel) काश्मीरमध्ये झेड सुरक्षेत (Z Security) फिरत होता. त्याने अनेक प्रमुख व्यक्तींची भेट घेतली. एवढंच नाही तर हाच तो किरण पटेल याने ज्या ठिकाणी सामान्य लोकांना जाणं शक्य नसतं अशा ठिकाणी जाऊन तेथील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अखेर ३ मार्च रोजी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी किरण पटेलला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याचा खोटेपणा उघड झाला.

किरण पटेलच्या अटकेनंतर मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. त्यानंतर अखेर शुक्रवारी श्रीनगर (Srinagar) जिल्हा न्यायालयाने किरण पटेल याला 15 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले की, त्यांना किरण पटेलवर संशय आला होता. त्यानंतर आम्ही त्याच्याविषयीची माहिती गोळा केली. त्याबद्दल श्रीनगर पोलिस प्रमुखांना अवगत केलं. त्यानंतर 2 मार्चला जम्मू काश्मीर पोलिसांच्या सीआयडी शाखेने किरण पटेलला अटक केली.

Updated : 2023-03-18T17:15:49+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top