Home > Politics > ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोणता पक्ष नंबर वन ठरला?

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोणता पक्ष नंबर वन ठरला?

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोणता पक्ष नंबर वन ठरला?
X

राज्यातील ५४७ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यामध्ये भाजपने आपणच सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी – शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला असून ५८१ पैकी २९९ ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच निवडून आले आहेत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केला आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालावरून नव्या सरकारच्या बुलेट ट्रेनने महाविकास आघाडीच्या ऑटो रिक्षावर मात केल्याचे स्पष्ट झाल्याचे आहे. बुलेट ट्रेन सुसाट निघाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

"दिल्ली ते गल्ली' पुन्हा एकदा भाजप! ग्रामपंचायत निवडणूकीत महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा भाजप - शिवसेना युतीला जनमताचा कौल दिला! भाजपा - २७४ शिवसेना - ४१ राष्ट्रवादी कोंग्रेस - ६२ काँग्रेस - ३७ उध्दव ठाकरे गट - १२ भाजपला भरभरून प्रेम देणाऱ्या जनतेचे मनपूवर्क आभार!" असे भाजपने म्हटले आहे.



तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी "शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीकडे असणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या जास्त आहे." तसेच य़ा निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नसल्याने भाजपच्या दाव्यात तथ्य नाही असे त्यांनी म्हटले आहे.



सर्वच पक्ष सर्वाधिक दावे करत असल्याने नंबर वन नेमके कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे काल (ता. १८) प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यांची आज (ता. १९) मतमोजणी पार पडली. पक्षीय स्थितीबाबत बऱ्याच जणांकडून विचारणा होत असून त्याबाबत माहितीस्तव...या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्यामुळे पक्षीय बलाबलाची आकडेवारी नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Updated : 1 Feb 2023 1:48 PM IST
Next Story
Share it
Top