Home > Politics > नांदेड दौऱ्यात महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचे उत्तर

नांदेड दौऱ्यात महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचे उत्तर

नांदेड दौऱ्यात महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचे उत्तर
X

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नांदेड, हिंगोली आणि परभणी दौऱ्यावरुन राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये पुन्हा संघर्ष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला उत्तर देत या वादावर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. दौऱ्याचे राजकाऱण तुम्ही करत आहात मी नाही, असा टोला राज्यपालांनी लगावला आहे. या दौऱ्याला राज्य सरकारने आक्षेप घेतल्याबाबत पत्रकांरीन विचारले तेव्हा, राजकारण करणाऱ्यांना करू द्या, पत्रकार तर राजकारण करीत नाही ना, असा उपरोधिक सवाल विचारला.

नांदेड दौऱ्या दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यापुढे विद्यापीठासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. विद्यापीठातील रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टार्ट अप अशा त्यांनी उपक्रमांना भेटी दिल्या.




कोविडच्या काळात येता आले नाही, म्हणून आतातरी नांदेड पाहायला जावं म्हणून हा दौरा आखला असेही राज्यपालांनी सांगितले. "मी माझ्या अखत्यारीत असलेल्या विषयावर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बोललो आहे" असे म्हणत राज्यपालांनी या विषयावर बोलणे टाळले. सरकारच्या आक्षेपाबद्दलच्या कुठल्याही विषयावर बोलण्याचे त्यांनी टाळले. राज्य सरकारच्या अधिकारांवर आपण अतिक्रमण करीत आहात असा आक्षेप सरकारने घेतल्याचे पत्रकारांनी त्यांना विचारले, या प्रश्नाला उत्तर देताना कोश्यारी म्हणाले की, "मी कोणतीही जिल्हा आढावा बैठक घेतलेली नाही. फक्त मला संविधानाने दिलेले अधिकार वापरून विकासासंदर्भात मी काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली." असे उत्तर त्यांनी दिले.

Updated : 5 Aug 2021 1:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top