Home > Politics > बंडखोर आमदारांच्या हॉटेलमधून दोघांना केली अटक

बंडखोर आमदारांच्या हॉटेलमधून दोघांना केली अटक

बंडखोर आमदार राहत असलेल्या हॉटेलमधून एक महिला आणि एक पुरुष असं दोघांना गोवा पोलिसांनी अटककेल्याचे वृत्त

बंडखोर आमदारांच्या हॉटेलमधून दोघांना केली अटक
X

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंडखोरी करत अखेर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे दोन दिवसीय विशेष अधिवेशनात विधानसभाध्यक्ष निवड आणि बहुमत चाचणी होणार आहे. त्यापुर्वी बंडखोर आमदारांना गोव्यातील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. तर या हॉटेलमधून गोवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासह बंडखोर आमदार सुरतमार्गे गुवाहाटी आणि त्यानंतर गोव्यातील हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बंडखोर आमदार मुक्कामी असलेल्या गोव्यातील हॉटेलमधून दोघांना अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंडखोरी केली होती. तर त्यांच्यासोबत बंडखोर आमदारांचा पाठींबा असल्याचे म्हटले आहे. तर शिवसेनेचे आमदार सुरतमार्गे गुवाहाटी आणि त्यानंतर गोव्यातील ताज हॉटेलमध्ये (Goa Taj Hotel) उतरले होते. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. तर एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची चर्चा असताना त्यांना थेट मुख्यमंत्री पद देण्यात आले. त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. त्यानंतर शिंदे यांना रविवारी आणि सोमवारी होणाऱ्या विशेष अधिवेशनात विधानसभाध्यक्ष निवड आणि बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी बंडखोर आमदारांना शनिवारी मुंबईत आणण्यात आले. मात्र हे बंडखोर आमदार ज्या ताज हॉटेलमध्ये मुक्कामी होते. त्या हॉटेलमधून दोघांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे.

फेक आयडीमुळे अटक

शिंदे गटाचे बंडखोर आमदार थांबलेल्या ताज हॉटेलमध्ये हरियाणा आणि उत्तराखंड येथील दोन जण फेक आयडी (Fake ID) च्या माध्यमातून थांबले होते. तर यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे ते हेरगिरी करत असण्याची शंका आल्याने गोवा पोलिसांनी दोघांना अटक केली. तर चौकशीदरम्यान तिघांचे ओळखपत्र फेक असल्याचे दिसून आले.

मात्र त्यापुर्वीच बंडखोर आमदार मुंबईत होणाऱ्या विशेष अधिवेशन आणि बहुमत चाचणीसाठी मुंबईला रवाना झाले होते. ते सायंकाळी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर रात्री ऊशीरा गोव्यातील ताज हॉटेलमधून दोघांना अटक केली असल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

Updated : 3 July 2022 3:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top