News Update
Home > Politics > गोव्यात महाविकास आघाडी, अन्यथा राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेस सोबत जाणार?

गोव्यात महाविकास आघाडी, अन्यथा राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेस सोबत जाणार?

गोव्यात महाविकास आघाडी, अन्यथा राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेस सोबत जाणार?
X

देशात पाच राज्याच्या निवडणूकीवरून राजकारण तापलं असताना तृणमूल काँग्रेस ने अनेक राज्यात काँग्रेसला धक्का देत काँग्रेस च्या अनेक नेत्यांना प्रवेश दिला आहे. या वरून काँग्रेस च्या गोटात चिंतेचे वातावरण असताना राष्ट्रवादीने देखील काँग्रेस ला अल्टीमेटम दिला असून गोव्यात महाविकास आघाडी ने एकत्रित येत निवडणूक लढाव्यात अन्यथा आम्ही तृणमूल काँग्रेस सोबत जाऊ. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस ने काँग्रेस नेत्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

गोव्यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे गोव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीची ऐन निवडणूकीच्या तोंडावर गोची झाली आहे. गोव्यात सध्या तृणमूल काँग्रेस, आपने भाजप समोर आव्हान निर्माण केले आहे.

अशा परिस्थितीत गोव्यात महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढावी. असा सल्ला राष्ट्रवादीने काँग्रेस नेतृत्वाला दिला आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Updated : 22 Dec 2021 7:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top