Home > Politics > खडसे जिवंत असतांना फोटो कशाला : गिरीश महाजन

खडसे जिवंत असतांना फोटो कशाला : गिरीश महाजन

खडसे जिवंत असतांना फोटो  कशाला : गिरीश महाजन
X

जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे, या निवडीनंतर मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी अध्यक्ष केबिनमध्ये असलेला एकनाथ खडसे यांचा फोटो हटवण्यात आला. या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.दरम्यान, एकनाथ खडसे यांचा फोटो पाठवण्यात आल्यासंदर्भात पत्रकारांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना विचारणा केली असता, मला कळत नाही अध्यक्षाच्या केबिनमध्ये खडसे यांचा फोटो कसा काय लागू शकतो. जिवंतपणी एखाद्या व्यक्तीचा फोटो कसा लावता येतो? प्रोटोकॉल असेल तर आपण एखाद्या व्यक्तीचा लावू शकतो. पंतप्रधान, राष्ट्रपती तसंच मुख्यमंत्री यांचे फोटो लावता येतात. पण व्यक्तीचा फोटो लावता येत नाही. म्हणून निवडून आलेल्या सर्व संचालकांनी खडसेंचा फोटो खाली घेण्याची विनंती केली. त्यानुसार शिपायाच्या मार्फत आम्ही तो फोटो काढायला लावला, असे गिरीश महाजन म्हणाले.

Updated : 18 Dec 2022 7:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top