Home > Politics > माजी खासदार हरिभाऊ राठोडांचा भारत राष्ट्रीय समिती पक्षात जाहीर प्रवेश...

माजी खासदार हरिभाऊ राठोडांचा भारत राष्ट्रीय समिती पक्षात जाहीर प्रवेश...

भटके विमुक्त समाजाचे राष्ट्रीय नेते माजी खासदार (Former MP) हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrasekhar Rao) यांच्या उपस्थितीत ४ मार्च २०२३ रोजी जाहीर प्रवेश केला.

माजी खासदार हरिभाऊ राठोडांचा भारत राष्ट्रीय समिती पक्षात जाहीर प्रवेश...
X

भटके विमुक्त समाजाचे राष्ट्रीय नेते माजी खासदार (Former MP) हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrasekhar Rao) यांच्या उपस्थितीत ४ मार्च २०२३ रोजी जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) ही देशातील फार चांगली पार्टी आहे. सर्वसामान्यांचे प्रश्नासंदर्भात त्यांचं चांगलं काम आहे. परंतु त्याही पेक्षा भारत राष्ट्र समिती बी.आर.एस. ही पार्टी अधिक चांगली असून, ती गोरगरीब, दलित आणि खास करून शेतकऱ्याची किसान पार्टी आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असे मत राठोड यांनी व्यक्त केले.

गोरगरीब आणि शेतकरी यांच्या संदर्भात अनेक चांगल्या योजना या पक्षाकडे आहेत. आणि या सर्व बाबींचा विचार करून मी या पक्षाकडे आकर्षित झालो, असल्याचे राठोड यांनी सांगितले. राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्न संदर्भात जाण असणारे एकमेव नेते के. चंद्रशेखर राव (K.Chandrasekhar Rao) हे आहेत असा असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना मोफत वीज, शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास ५ लाख रुपयांची विमा योजना, मुलगी जन्माला आल्यास के.सी.आर. किट तसेच १३००० रुपयांची आर्थिक मदत आणि मुलासाठी एक लाख १६ हजार रुपये आर्थिक मदत, तर वस्ती दवाखाना, दलित बंधू योजनेत १० लाख रुपये उद्योगधंद्यासाठी मदत देण्याची योजना, इत्यादी योजना के.सी.आर. सरकार राबवत आहेत. अशी माहिती राठोड यांनी दिली.

याप्रसंगी आमदार बालका सुमन, राज्यसभा सदस्य जोगिन पल्ली, संतोष कुमार, हिमांशू तिवारी, आमदार जोग रामन्ना, माजी खासदार नागेश घोडाम आदिलाबाद माजी आमदार दीपक आत्राम, माननीय मंत्री सत्यवती राठोड, आमदार रेखा नायक, माणिक कदम, प्रदेश किसान सेल (महाराष्ट्र) अमृतलाल चव्हाण बी.आर.एस.नेते आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 8 March 2023 9:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top