Home > Politics > उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का

उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का

उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का
X

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे साथीदार दीपक सावंत (Deepak Sawant) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू साथीदार आणि माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेले दीपक सावंत यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.

दीपक सावंत यांची विधानपरिषदेची मुदत संपल्यानंतर संधी न दिल्याने सावंत नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच आता दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे दीपक सावंत यांच्या शिंदे गटात केलेल्या प्रवेशामुळे शिंदे गटाला बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Updated : 15 March 2023 1:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top