Home > Politics > केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर महाडमध्ये गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर महाडमध्ये गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर महाडमध्ये गुन्हा दाखल
X

रायगड :महाड येथील पत्रकार परिषदेत केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी राणेंविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.

दरम्यान केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान राज्यसरकारवर नारायण राणे यांच्या विरोधात सडकून टीका केली जात आहे.

आक्षेपार्ह विधान नारायण राणेंना चांगलेच भोवण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरील टिकेनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. या प्रकारानंतर शिवसेनेने महाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

युवा सेनेचे सिद्धेश पाटकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना व राणे यांच्यात संघर्ष पेटला आहे, हे प्रकरण अधिक चीघळण्याची शक्यता असून राज्यभर याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. नारायण राणेंच्या वक्तव्याचा शिवसेनेने निषेध दर्शविला आहे, मुख्यमंत्र्यांच्या नादाला पुन्हा लागू नका असा इशारा महाड व पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांनी दिला आहे .

Updated : 24 Aug 2021 6:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top