Home > Politics > एकट्या मोदींच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नाही; केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांच्या वक्तव्याने खळबळ

एकट्या मोदींच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नाही; केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांच्या वक्तव्याने खळबळ

एकट्या मोदींच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नाही; केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांच्या वक्तव्याने खळबळ
X

मुंबई : एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून राहून आपल्याला मतं मिळू शकत नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी केलं आहे. ते पक्षाच्या बैठकीत बोलत होते. बैठकीमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजपा तिसऱ्यांदा हरियाणामध्ये सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत असताना राव इंद्रजित सिंह यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. नियोजन आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी कार्यकर्त्यांना एकट्या मोदींच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नसल्याचं म्हटले आहे.

"नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आपल्यावर आणि राज्यावर आहे. मतदार मोदींच्या नावे मतं देतील असा आपला हेतू असू शकतो, पण हे सर्व तळागळात काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. मतदार मत देतील हे त्यांच्यावरच अवलंबून आहे," असं त्यांनी म्हटले आहे.

यावेळी राव इंद्रजित सिंह यांनी भाजपाच्या २०१४ मधील मोठ्या विजयाचा उल्लेख करताना म्हटलं की, "केंद्रात मोदींमुळेच भाजपा सत्ता स्थापन करु शकली हे आम्हाला मान्य आहे. त्याचा राज्यांमध्येही फरक पडला आहे. हरियाणातही पहिल्यांदा भाजपाने आपलं सरकार स्थापन केलं. दुसऱ्यांदाही भाजपाला यश मिळालं. पण अशावेळी शक्यतो दुसऱ्या पक्षाला संधी मिळते".

राज्यात भाजपाला पहिल्यावेळी ९० पैकी ४७ जागा मिळाल्या, तर दुसऱ्यावेळी ४० जागा मिळाल्या असं सांगताना विजयीची आकडेवारी कमी होत असते असं त्यांनी सांगितलं. पण या ४५ जागा आपण राखू शकतो का? याचा विचार करणं गरजेचं आहे असं राव इंद्रजित सिंह यांनी म्हटले आहे.

Updated : 14 Oct 2021 3:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top