Home > Politics > माजी आ. राजेश क्षीरसागर यांच्या निवडणुकीबाबतच्या वक्तव्यावरून संदीप देसाई यांची टीका

माजी आ. राजेश क्षीरसागर यांच्या निवडणुकीबाबतच्या वक्तव्यावरून संदीप देसाई यांची टीका

माजी आ. राजेश क्षीरसागर यांच्या निवडणुकीबाबतच्या  वक्तव्यावरून संदीप देसाई यांची टीका
X

कोल्हापूर : माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करणार असल्याचं विधान केलं होतं, याच विधानाचा आधार घेत आम आदमी पार्टी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे असं आपचे संदीप देसाई यांनी सांगितले आहे. त्यामुळे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना हे वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे.

दरम्यान याबाबत बोलताना देसाई म्हणाले की, कोल्हापूरची जनता लोकशाही मानणारी जनता आहे, क्षीरसागर यांचे हे विधान लोकशाहीला मारक ठरणार आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने हे विधान गांभीर्याने घेऊन योग्य कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. दरम्यान साम-दाम- दंड- भेद ची भाषा करणाऱ्यांना कोल्हापूरची जनता जागा दाखवेल असं त्यांनी म्हटले आहे.

Updated : 31 Oct 2021 5:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top