Home > Politics > एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना आणखी धक्का

एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना आणखी धक्का

एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना आणखी धक्का
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा उगारणाऱ्या आमदारांवर पक्षाने आता कारवाईला सुरूवात केली आहे. त्यासंदर्भात पक्षाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी सर्व आमदारांना नोटीस पाठवत संध्य़ाकाळी ५ वाजता होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयालाच आव्हान दिल आहे.

त्यांनी ट्विट करुन एक माहिती दिली आहे. "शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.


एकनाथ शिंदे हे आपण अजूनही पक्षाचे गटनेते असल्याने निर्णयाचे अधिकार आपल्याकडे असल्याचे सांगत आहेत. तर अजय चौधरी यांची पक्षाने गटनेतेपदी केलेली नियुक्ती बेकायदा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पक्षाच्या या आदेशालाही एकनाथ शिंदे यांनी आव्हान देत बेकायदा ठरवल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना आणखी धक्का

पार्श्वभूमीवर पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवार दि. २२ जून, २०२२ रोजी, वर्षा बंगला, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई ४००००६ येथे सायंकाळी ०५.०० वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.

सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्यावर पाठविली आहे. त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमे, व्हॉट्स अॅप आणि एस.एम.एस. द्वारेही कळविली आहेत. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहाता येणार नाही.

सदरहू बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदी नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असा इशारा या पत्रामध्ये देण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीला शिवसेनेचे किती आमदार उपस्थित राहतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 22 Jun 2022 7:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top