Home > Politics > मंत्रीमंडळ विस्तार: पत्ता कट झालेल्या अब्दुल सत्तार यांचं नाव मंत्रीमंडळात कसं आलं?

मंत्रीमंडळ विस्तार: पत्ता कट झालेल्या अब्दुल सत्तार यांचं नाव मंत्रीमंडळात कसं आलं?

मंत्रीमंडळ विस्तार: पत्ता कट झालेल्या अब्दुल सत्तार यांचं नाव मंत्रीमंडळात कसं आलं?
X

टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचं नाव आल्यानंतर सत्तार यांचा महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार नाही. हे जवळ जवळ निश्चित मानले जात होते. टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानंतर सत्तार यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत मुंबई गाठली. नांदेड दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे तीन वाजता नंदनवन बंगल्यावर परतले.

मुख्यमंत्री बंगल्यावर परतल्यानंतर त्या ठिकाणी शिंदे गटाच्या 14 आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत दीपक केसरकर, दादा भुसे, महेश शिंदे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, उदय सामंत आणि अब्दुल सत्तार हे आमदार उपस्थित होते. ही बैठक जवळ जवळ पहाटे 5:30 वाजेपर्यंत सुरु होती. या बैठकीत अब्दुल सत्तार यांचं नाव निश्चित झालं तर संजय शिरसाठ यांचं नाव वगळण्यात आल्याचं बोललं जात आहे. यावेळी संजय शिरसाठ यांना मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेल्या कामाचा दाखला देत मंत्रीपदाचं नाव वगळल्यानं नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.

औरंगाबाद मधून संजय शिरसाठ आणि अब्दुल सत्तार यांची नाव चर्चेत होती. दोनही नेत्यांनी मुंबईमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं. संजय शिरसाठ यांनी गुवाहटीच्या बंडात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळं त्यांचं नाव निश्चित मानलं जात होतं. त्यातच सत्तार यांचा टीइटी घोटाळा नाट्यमयरित्या बाहेर आला. त्यामुळं शिरसाठ यांचं नाव निश्चित झालं होतं.

अब्दुल सत्तार यांना कॉंग्रेसमधून भाजपमध्ये जायचं होतं. विखे पाटील आणि सत्तार दोघंही चांगले मित्र आहेत. विखे यांच्या प्रवेशावेळीच सत्तार यांनी भाजपमध्ये जायचं होतं. मात्र, सत्तार यांची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानं फडणवीस यांनी सत्तार यांना शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ते शिवसेनेत गेले. आज जेव्हा सत्तार यांच्या नावावर गंडातर आलं तेव्हा फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली आणि सत्तार यांचा मार्ग मोकळा झाला. मात्र, संजय शिरसाठ यांचा पत्ता कट झाल्यानं संजय शिरसाठ प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे.

औरगांबाद जिल्ह्यातून आमदार अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि संजय शिरसाठ या तीन नेत्यांची नाव चर्चेत होती. मात्र, एकट्या औरंगाबाद जिल्ह्याला एकनाथ शिंदे गटाला तीन मंत्री पद देणं शक्य नव्हतं. म्हणून संजय शिरसाठ यांचं नाव वगळण्यात आलं.

Updated : 9 Aug 2022 7:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top