Home > Politics > एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ चित्रा वाघ मैदानात

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ चित्रा वाघ मैदानात

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसैनिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ चित्रा वाघ मैदानात
X

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या (BJP) मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कामाला सुरूवात केली आहे. मात्र त्यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्यामुळे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे शिवसैनिकांकडून (Shivsena) एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले जात आहे. तसेच गद्दार म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) या एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत.

चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतूक केले आहे. तसेच ट्वीट करून म्हटले आहे की, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नाही किंवा फोनवरून नाही तर मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मुंबई महापालिकेच्या (BMC) आपत्कालिन व्यवस्थापन नियंत्रण कक्षात दाखल झाले. याला म्हणतात काम आणि जनतेची काळजी, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतूक केले.

चित्रा वाघ यांनी हे ट्वीट महाराष्ट्र डीजीआयपीआरला कोट केले आहे. ज्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट दिली होती.

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकांमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्शन मोडवर आल्याने आणि त्यांनी थेट महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन आढावा घेतल्याने चित्रा वाघ यांनी कौतूक केले आहे.

Updated : 6 July 2022 4:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top