Home > Politics > हिंदवी तोफ धडाडणार म्हणत शिंदे गटाचा टिजर प्रदर्शित

हिंदवी तोफ धडाडणार म्हणत शिंदे गटाचा टिजर प्रदर्शित

संपुर्ण राज्याचे लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याकडे लागले आहे. त्यातच शिंदे गटाने मेळाव्याचा ट्रिजर प्रदर्शित करून आघाडी घेतली आहे.

हिंदवी तोफ धडाडणार म्हणत शिंदे गटाचा टिजर प्रदर्शित
X

दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या वादावर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पांघरूण पडले. मात्र आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या गटाने दसरा मेळाव्याचा ट्रेलर प्रदर्शित करून आघाडी घेतली आहे.

दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा कुणाचा होणार? यावरून वाद सुरू होता. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दसरा मेळाव्याच्या वादावर पांघरूण पडले. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच एकनाथ शिंदे गटाने बीकेसी येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवर दसरा मेळाव्याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासह एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा भाषण करतानाचा फोटो वापरला आहे. त्यावर एक नेता , एक पक्ष, एक विचार, एक लव्य आणि एक नाथ असे विशेषण वापरले आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचे पार्श्वसंगीत लावले आहे.

राज्यातील नागरिकांचे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे लक्ष असते. मात्र यंदा आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांनी मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्याचा चंग बांधला होता. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने या वादावर पडदा पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर तर उध्दव ठाकरे यांचा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे. त्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यातच शिंदे गट का फुटला? याचे उत्तर बीकेसी मैदानावर देणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

दुसरीकडे उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या निमीत्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सर्व जिल्हाप्रमुखांना आदेश दिले आहेत. या मेळाव्याला येणाऱ्या नागरिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. मात्र शिंदे गटानेही दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे म्हटले आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथून 25 ते 30 हजार शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होणार असल्याचे सांगितले. तर मंत्री दीपक केसरकर यांनी या मेळाव्यासाठी लाखो लोक येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळातील मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांवर प्रभाव टाकण्यासाठी दसरा मेळावा महत्वाचा ठरणार आहे.

Updated : 29 Sep 2022 2:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top