Home > Politics > देवेंद्र फडणवीस यांना शिंदे सरकारमध्ये मंत्री व्हावे लागणार, अमित शाह यांचे आदेश

देवेंद्र फडणवीस यांना शिंदे सरकारमध्ये मंत्री व्हावे लागणार, अमित शाह यांचे आदेश

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीपासून राज्यात सुरू झालेल्या राजकीय भूकंपाची तीव्रता गुरुवारी आणखी वाढली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि आतापर्यंत वर्तवले जाणारे सर्व अंदाज चुकीचे ठरले.

देवेंद्र फडणवीस यांना शिंदे सरकारमध्ये मंत्री व्हावे लागणार, अमित शाह यांचे आदेश
X

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील आणि भाजप त्यांना समर्थन देईल अशी घोषणा केली. पण त्याचबरोबर आपण स्वतः मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणीस यांचा हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असल्याची चर्चा सुरू झालेली असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडल्याने देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवले आहे आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं, तसंच मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही अशी भूमिका मांडली, हे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण पक्षाने असा निर्णय घेतला आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं असं वक्तव्य जे पी नड्डा यांनी केले आहे.

जेपी नड्डा यांच्या या घोषणेनंतर काही मिनिटातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट ट्विटरवरून देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये सहभागी होतील अशी घोषणा केली आहे,

"भाजपा अध्यक्ष श्री @JPNadda जी के कहने पर श्री @Dev_Fadnavis जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है।

"यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवाभाव का परिचायक है। इसके लिए मैं उन्होंने हृदय से बधाई देता हूँ।"

नड्डा यांच्या भूमिकेमुळे आता देवेंद्र फडणवीस हे एकदा मुख्यमंत्री राहिल्यानंतर राज्य मंत्रिमंडळात दुय्यम दर्जाचे स्थान स्वीकारतील का, अशी चर्चा सुरू झाली होती,. पण भाजपमधील पक्षशिस्त पाहता फडणवीस यांनी वरिष्ठांचा आदेश न टाळता शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यास तयारी दाखवली आहे.

Updated : 30 Jun 2022 7:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top