Home > Politics > शिवसेनेतील पक्षप्रमुख आणि कार्याध्यक्ष पद रद्द

शिवसेनेतील पक्षप्रमुख आणि कार्याध्यक्ष पद रद्द

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक घेतली. यामध्ये काही महत्वाचे ठराव करण्यात आले आहेत.

शिवसेनेतील पक्षप्रमुख आणि कार्याध्यक्ष पद रद्द
X

निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली. याबरोबरच शिवसेनेत आजवर चालत आलेले पक्षप्रमुख आणि कार्याध्यक्ष ही पदं रद्द करण्यात आले आहेत. तसेच पक्षाविरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यास शिस्तपालन समितीला सामोरे जावे लागणार आहे.

या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यापुर्वी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 2003 मध्ये महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे झाली होती. त्यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना डावलून उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कार्याध्यक्ष करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर 20 वर्षाने ताज प्रेसिडेंट येथे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली. यावेळी कार्यकारिणीत महत्वाचे ठराव संमत झाले.

महत्वाचे ठराव-

  • मंत्री दावा भुसे (Dada Bhuse) यांच्या नेतृत्वात शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) आणि संजय मोरे (Sanjay More) यांची शिस्तपालन समिती स्थापन करण्यात आली.
  • स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (VD Savarkar) यांना भारतरत्न देण्याची मागणी
  • वीरमाता अहिल्याबाई होळकर (Veermata Ahilyabai Holkar), छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचे नाव राष्ट्रीय महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे ही मागणी
  • राज्यात येणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्या
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
  • स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामिण भागात प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याचा ठराव
  • चर्चगेट (Churchgate Railway Station) स्थानकाला चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी
  • शिवसेनेने कोणासोबत युती करावी याबाबत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे काही विचार होते. त्यानुसार कोणाशीही युती करताना त्यापुर्वी झालेली चूक पुन्हा होणार नाही, असा संकल्प करण्यात आला.

Updated : 22 Feb 2023 3:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top